Pimpri Chinchwad Hit And Run Case | पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक हिट अँड रन केस, 24 तासानंतरही गुन्हा दाखल नाही

0

पिंपरी : Pimpri Chinchwad Hit And Run Case | पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हिट अँड रनचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंजवडीत घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 20 दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या (Bhosari MIDC Police Station) हद्दीत देखील अशाच प्रकारची घटना घडली आहे. मात्र, 24 तास उलटून गेल्यानंतर देखील या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कार चालकावर गुन्हा दाखल केला नसल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी (दि.12) भरधाव कारने एका महिलेला धडक दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्वराज सिटी समोर (Swaraj City Chowk) ही घटना घडली आहे. एका भरधाव कारने आपल्या मुलींसोबत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या धडकेत महिला जवळपास 7 ते 8 फूट उंचावर उडून खाली पडली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

थरकाप उडवणारा अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.