Chandani Chowk Pune Accident News | पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात, कंटेनरची मालवाहतूक करणाऱ्या एसटी बससह पादचाऱ्यांना धडक; तीन जखमी, एक गंभीर

0

पुणे : – Chandani Chowk Pune Accident News | पुण्यात अपघातांची मालिका सुरुच आहे. बुधवारी गंगाधाम चौक परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.13) मुंबई-बंगळुरु एक्सप्रेसवेवर चांदणी चौकात एक भीषण अपघात झाला आहे. एका मिक्सरने डिवायडर तोडून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना उडवत एसटी बसला धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चारजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

चांदणी चौकातून कोथरुडच्या दिशेने येणाऱ्या महाकाय मिक्सरने डिव्हायडर तोडून पादचाऱ्यांना आणि मालवाहतूक करणाऱ्या बसला धडक दिली. यामध्ये चार जण जखमी झाले असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेवर प्रथम चेलाराम हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दीनानाथ हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. सध्या जखमी महिला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.

दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू

मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात भीषण अपघात झाला आहे. एका महिलेला भरधाव ट्रकने चिरडले. भरधाव डंपरने एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीवर बसलेल्या महिलेच्या धडापासून शीर वेगळे झाले. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या महिलेची सून गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी साडेबाराच्या सुमारास मार्केट यार्ड येथील गंगाधाम रस्त्यावर घडली. दमयंती भुपेंद्र सोलंकी (वय-59 रा. कोंढवा रोड, पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलचे नाव आहे. तर जखमी प्रियंका राहुल सोलंकी (वय-38) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालक अशोक छोटेलाल महंतो (वय- 37 रा. बावधन), गणेश प्रकाश बांदल (वय-26) यांना अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.