Kalyani Nagar Pune Accident | पुणे : दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला कोर्टाकडून शिक्षा, न्यायालयाने सुनावलेली शिक्षा ऐकून सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया

0

पुणे : – Kalyani Nagar Pune Accident | पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन या ठिकाणी रविवारी पहाटे नंबर प्लेट नसलेल्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर ज्या पोर्शे कारने दोघांना धडक दिली ती कार पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता. तो अल्पवयीन आहे. अपघातानंतर आरोपी मुलाला जमावाने बेदम चोप दिला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन सुट्टीच्या न्यायालयात हजर केले. न्यायलयाने त्याला अटी व शर्तींवर लगेच जामीन मंजूर केला.

भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणारा कराचालक अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. म्हणून गुन्हा दाखल करताना त्याच्याविरोधात जामीनपात्र कलमं लावण्यात आली. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात त्याला जामीनही मिळाला. तसेच आरोपी कारचालकानं पंधरा दिवस येरवडा ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावं, दारु सोडवण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावेत, अपघातावर त्यानं 300 शब्दाचा निबंध लिहावा, भविष्यात अपघात झाल्याचं निदर्शनास आल्यास मदत करावी असं न्यायालयाने त्याला जामीन देताना सांगितलं. मात्र, न्यायालयाने सुनावलेली शिक्षा ऐकून सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

याप्रकरणी विशाल अग्रवाल (Vishal Agarwal Builder) यांच्या १७ वर्षीय मुलावर भादवि कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन अधिनियम कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अकिब रमजान मुल्ला (वय २४, रा. चंदननगर, मुळ रा. लोकमान्य नगर, आसरा चौक, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. अपघात प्रकरणात आरोपीचे वडील आणि अल्पवयीन मुलांना दारू देणाऱ्या बारवर बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणि 77 नुसार कारवाई केली जाईल असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.