Shirur-Pune Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 13 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास बंदी

0

पुणे : Shirur-Pune Lok Sabha | १३ मे रोजी पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बेकायदेशीर जमाव तसेच सार्वजनिक सभा बैठका घेण्यास पुणे शहर पोलीस सहआयुक्त प्रविण पवार (IPS Pravin Pawar) यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे लोकसभांतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ तसेच शिरुर मतदार संघातील शिरुर व हडपसर विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या आदेशान्वये मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या ४८ तास अगोदर पासून बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.