Rahul Gandhi Sabha In Pune | पुण्यात आज राहुल गांधीची जाहीर सभा, मविआ उमेदवार सुळे, धंगेकर, कोल्हे, वाघिरेंचा करणार प्रचार

0

पुणे : Rahul Gandhi Sabha In Pune | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज सायंकाळी चार वाजता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांसाठी जाहीर सभा होणार आहे. आरटीओ शेजारील (RTO Office Pune) एसएसपीएमएसच्या मैदानावर (SSPMS Ground) ही सभा होणार होईल. बारामतीच्या (Baramati Lok Sabha) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule), पुण्यातील (Pune Lok Sabha) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), शिरूरचे (Shirur Lok Sabha) उमदेवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि मावळचे उमेदवार (Maval Lok Sabha) संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांच्या प्रचारासाठी ही सभा होत आहे.

काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) आणि माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi Congress) यांनी सभेसंबंधी माहिती देताना सांगितले की, सभास्थळी एलईडी स्क्रीन, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेला महासचिव रवी चेन्नी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

अरविंद शिंदे म्हणाले की, सभेसाठी ४० फूट गुणिले ३० फूटाचे व्यासपीठ उभारले आहे. ३० ते ३५ हजार नागरिकांसाठी आसन व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव १० ते १२ हजार आसन क्षमता कमी झाली आहे. येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळून व्हीव्हीआयपींना प्रवेश दिला जाणार आहे.

अरविंद शिंदे म्हणाले एकुण तीन प्रवेशद्वारे असून ४ ठिकाणी एलईडी स्क्रिन उभारले आहेत. सभेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, बिस्कीट, रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची पथके तैनात केली आहेत.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी, तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.