Mumbai South Lok Sabha Constituency | उमेदवारी मागे घे, अपक्ष उमेदवाराला धमकी, ५ लाखांचे दाखवले आमिष, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

0

मुंबई : Mumbai South Lok Sabha Constituency | कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha) अपक्ष उमेदवाराला भाजपा कार्यकर्त्याने (BJP Worker) धमकी दिल्याचे प्रकरण घडले असतानाच आता मुंबई दक्षिण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रशांत घाडगे (Prashant Ghadge) यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. तसेच घाडगे यांना २ ते ५ लाखांचे आमिष देखील (Lure Of Money) दाखवण्यात आले आहे. याप्रकरणी शिंदे गटाच्या (Shivsena Eknath Shinde) पदाधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या विभागप्रमुख आणि पक्ष सचिवाविरोधात कफ परेड पोलिस ठाण्यात (Cuffe Parade Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई दक्षिण मतदारसंघ आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. याच मतदारसंघामध्ये प्रशांत घाडगे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर ठाकरे गटाकडून अरविंद सावंत (Arvind Sawant) उमेदवार आहेत.

दक्षिण मुंबई मतदारसंघात आपला उमेदवार निवडून यावा यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्यातच अपक्ष उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. कल्याणमध्ये देखील अपक्ष उमेदवाराला धमकी देण्याचा प्रकार घडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.