ACB Raid On PI Haribhau Khade | लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेच्या घरात सापडले ‘घबाड’; 1.8 कोटींची रोकड, 970 ग्रॅम सोनं, 5.5 किलो चांदी याशिवाय बारामती, परळी, इंदापूरमध्ये मालमत्ता
पुणे : – ACB Raid On PI Haribhau Khade | बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेटच्या (Jijau Multistate Cooperative Society Beed) गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी बिल्डरकडून (Builder In Beed District) एक कोटी रुपयांची लाच मागून सहकार्यामार्फत 5 लाख घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे (Beed EoW) पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (Police Inspector Haribhau Khade) याच्या चाणक्यपुरीतील घराची एसीबीने न्यायालयाच्या परवानगीने झडती घेतली. या घरातून 1 कोटी 8 लाखांची रोकड, 72 लाख रुपयांचे 970 ग्रॅम सोने, 4 लाख 62 हजार रुपये किमतीचे साडेपाच किलो चांदी असा एकूण 1 कोटी 85 लाखांचा ऐवज जप्त केला आहेत. याशिवाय खाडे याच्या नावावर बारामती (Baramati), इंदापूरमध्ये (Indapur) प्रत्येकी फ्लॅट, इंदापूरमध्ये व्यापारी गाळा, तसेच बारामती व परळीत (Parali) दोन फ्लॅट असलेली कागदपत्रे एसीबीच्या पथकाने जप्त केली आहेत.
या प्रकरणात कुशल प्रवीण जैन (Kushal Pravin Jain) याला बुधवारी लाच घेताना अटक केली होती. तर पोलीस निरीक्षक खाडे आणि लाच घेण्यास प्रोत्साहन देणारा सहायक फौजदार रविभुषन जाधवर (Ravibhushan Jadhaver) हे दोघे फरार झाले आहेत. या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई बीडच्या एसीबीने (Beed ACB) बुधवारी (दि.15) सायंकाळी बीड शहरातील सुभाष रोडवर (Subhas Road Beed) केली.
सहायक फौजदार जाधवर च्या घरातून सोने जप्त
सहायक फौजदार रविभुषन जाधवर याच्या घराची बुधवारी रात्रीच झडती घेतली. तिथे 15 हजार रुपयांची रोकड आणि 25 तोळे सोने सापडले. दरम्यान खाडेचा सहायक व्यापरी कुशल जैन याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
बीड शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट पतसंस्थेत मागील वर्षी 100 कोटींचा घोटाळा झाला होता. या पतसंस्थेचे प्रमुख बबन शिंदे, अध्यक्षा अनिता शिंदे, व्यवस्थापक सुनीता वांढरे व इतरांवर एकूण 4 गुन्हे नोंद असून याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खाडे यांच्याकडे होता. याप्रकरणी अनिता शिंदे अटकेत असून इतर फरार आहेत. बबन शिंदे याने दोन व्यावसायिकांना बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोटी 60 लाख रुपये दिले होते. त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांची चौकशी सुरु होती. या गुन्ह्यात आरोपी करण्याची भीती दाखवून, खाडे याने दोघांकडे प्रत्येकी 50 लाख असे एकूण एक कोटी रुपयांची लाच मागितली. तर तडजोडी अंती 30 लाख रुपये देण्याचे ठरले होते. यापैकी 5 लाखांचा पहिला हप्ता घेताना कापड व्यापारी कुशल जैन याला एसीबीने रंगेहाथ पकडले. एसीबीने कारवाई केल्याचे समजताच पोलीस निरीक्षक खाडे आणि सहायक फौजदार रविभुषन जाधवर हे फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.