Kalyan Lok Sabha | मुसळधार पावसात मुख्यमंत्र्यांची पूत्रासाठी प्रचार रॅली, म्हणाले – ‘ही तर विजयाची सलामी आणि मोठ्या मताधिक्याची चाहूल’

डोंबिवली : Kalyan Lok Sabha | कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार (Mahayuti Shivsena Candidate) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पूत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या प्रचारासाठी कल्याणमधील नांदिवली स्वामी समर्थ मठ (Nandivali Swami Samarth Math) ते एमआयडीसी अशी प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत स्वत: मुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते. मात्र, रॅली सुरू असताना मुसळाधार पाऊस कोसळू लागला, परंतु रॅली सुरूच ठेवण्यात आली होती. हा मुसळधार पाऊस म्हणजे आपल्या विजयाची सलामी आणि मोठ्या मताधिक्याची चाहूल आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.
या रॅलीत खासदार डॉ. शिंदे, मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod), खा. श्रीरंग बारणे (Shrirang Barne), शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे (Gopal Landge), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) सहभागी झाले होते.
या रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे म्हणाले, यांना बाळासाहेबांची विचारधारा राहिली नाही. सावरकरांची बदनामी यांना चालते. सावरकरांची बदनामी करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसतात. औरंगजेबाची बाजू हे घेतात.
बॉम्बस्फोटातील याकूब मेमन (Yakub Memon) यांच्या कबरीचे उदात्तीकरण हे करतात. यांच्या प्रचार मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात तरी हे मौन बाळगून आहेत. काश्मीर विषयावर नेहमीच विरोधी भूमिका घेणारे फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, असा घणाघात शिंदे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, अशा नकारात्मक वातावरणात यांचा वावर सुरू आहे. अशा वातावरणात हे कसे जपतील बाळासाहेबांची हिंंदुत्ववादी विचारधारा. यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेला मूठमाती देण्याचे काम केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.