Baramati Lok Sabha Election 2024 | भरसभेत अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याने फोडलं मडकं, बारामतीमध्ये राजकारण तापलं, नक्की काय झालं?

0

बारामती : Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरूद्ध सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) सामना आता विचित्र वळण घेऊ लागला आहे. आरोप-प्रत्यारोप, टीका इथपर्यंत ठिक होते, मात्र अजित पवारांच्या एका पदाधिकाऱ्याने भरसभेत मडकं फोडण्याची विचित्र आणि आक्षेपार्ह कृती केली. या कृतीनंतर समर्थन आणि सारवासारव करण्यात आली असली तरी बारामतीमधील राजकारण तापलं आहे. कोणत्या धार्मिक विधीनंतर मडकं फोडलं जातं, हे मडकं कोणाच्या नावाचे फोडले असे प्रश्न विचारले जात आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारासाठी माळेगाव येथे आयोजित सभेत अजित पवार गटाचे पदाधिकारी रविराज तावरे यांनी लोकांसमोर मडके फोडले. सुनेत्रा पवार विजयी झाल्या नाही तर आपल्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे रविराज तावरे मडके फोडताना म्हणाले.

तावरेंची कृती आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत शरद पवार गटाचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला असून याबाबत अजित पवारांना जाब विचारला आहे.

तावरे यांच्या आक्षेपार्ह टीकेचे समर्थन आणि सारवासारव करताना आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले की, मडके फोडल्यावरून त्यांनी वेगळेच प्रश्न उपस्थित केले. दुष्काळी भागातील महिलांच्या डोक्यावर हंडा असतो.

आता विकासाच्या मार्गावरून जाताना कोरडा हंडा काय कामाचा. मग तो फेकलेला बरा, असा तावरेंच्या म्हणण्याचा अर्थ होता. मात्र अनेक मोठ्या सभा घेतल्यानंतर त्यांना सामान्य कार्यकर्त्याच्या या कृतीची दखल घ्यावी लागली, असे मिटकरी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.