Sharad Pawae Health Update | शरद पवारांना प्रकृती अस्वास्थामुळे आरामाचा सल्ला, प्रचाराची झाली दगदग, रोहित पवारांनी दिली प्रकृतीची अपडेट

0

पुणे : Sharad Pawae Health Update | २० दिवसांपासून शरद पवार निवडणूक प्रचारासाठी रात्रं-दिवस फिरायचे. निवडणुकांच्या धामधुमीतून केवळ ४ तास झोपायचे. मात्र, आता शरद पवार यांची तब्बेत चांगली आहे. आज बीड भागात त्यांच्या सभा आणि दौरे होते, तसेच पुण्यातही त्यांची सभा होणार होती. मात्र, प्रकृती अस्वास्थेमुळे त्यांचे आजचे सर्वच दौरे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार हे कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या बारामतीमधील (Baramati Lok Sabha) प्रचारासह राज्यभरातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मागील २० दिवस फिरत होते. या दगदगीचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असून डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांचे आजचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये शरद पवार यांनी सभा घेतल्या, प्रत्येक सभेत ते बोलत होते. यामुळे त्यांचा घसा बसला आहे. प्रकृती नरम आहे. यानंतर त्यांच्या प्रकृतीची माहिती आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांना दिली.

शरद पवार हे लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पहिल्या टप्प्यापासून कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने स्वता शरद पवार यांना या वयात दुप्पट मेहनत घ्यावी लागली. काही दिवसांपूर्वी अहमदनगरचे (Ahmednagar Lok Sabha) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या प्रचारसभेत बोलताना त्यांचा घसा बसला होता. तरीही पुढे त्यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या. या निवडणूक दौऱ्यांचा व सभांचा ताण पडल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना आरामाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

बारामती येथील सभेत भाषण करताना त्यांचे शब्द फुटत नव्हते. तरीही, लेकीसाठी त्यांनी ४ ते ५ मिनिटांचे भाषण केले. आज, रोहित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली.

दरम्यान, बीडमधील (Beed Lok Sabha) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार बजरंग सोनावणे (Bajrang Sonwane) यांनी फेसबुक पोस्ट लिहून शरद पवारांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन फेसबुक पोस्टद्वारे केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की…

साहेब, तब्येतीला जपा!
तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही..

तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. तुमच्या नावावरच झाल्या त्या! मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा.

लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिलंय. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा साहेब. आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या.

तुमचा,
बजरंग बप्पा!

बजरंग सोनावणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.