Rohit Pawar On Sunil Tatkare | ”तटकरे साहेब, तुमच्यासारखं केंद्रीय यंत्रणांना घाबरून सुटकेची भीक मागणारा…”, रोहित पवार यांनी कठोर शब्दात सुनावले

0

पुणे : Rohit Pawar On Sunil Tatkare | तटकरे साहेब तुमच्यासारखं केंद्रीय यंत्रणांना घाबरून अटकेपासून सुटकेची भीक मागणारा आणि विचारांशी गद्दारी करणारा मी नाही. भाजपमध्ये (BJP) जायचंच असतं तर आज केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी आपल्याप्रमाणे भाजपची आरती गात बसलो असतो, असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) नेते सुनील तटकरे यांच्यावर केला आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून (Hadapsar Vidhan Sabha) भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी रोहित पवार प्रयत्न करत होते अशी टीका सुनील तटकरेंनी केली होती. या टिकेनंतर संतापलेल्या रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट करून तटकरेंना कठोर शब्दात सुनावले आहे.

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, आता ज्याप्रमाणे दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली, त्याप्रमाणे अजितदादांचीही साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय? तेवढं सांगा! मी जे बोलतो ते पुराव्यासह बोलतो. आणि अजूनही बोलायला भाग पाडलं तर अनेकांना ते परवडणार नाही!

काय म्हणाले होते सुनील तटकरे…

सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवर टीका करताना म्हटले होते की, रोहित पवार हे २०१९ मध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुणाच्या मार्फत आपल्या वडिलांना घेऊन विनवण्या करत होते, या बाबतची माहिती आमच्याकडे आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे हे महाशय कर्जत जामखेड विधानसभेतील आमदारकीचा राजीनामा देऊन, भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी आपल्या वडिलांसह कुणाला घेऊन किती वाट पाहत होते हे मला माहीत आहे. अशा बालबुद्धी व्यक्तीबद्दल मला फारसं काही बोलायचं नाही, असे तटकरे म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.