Sunetra Ajit Pawar | लोकांच्या प्रश्नांची सोडवणुक करणं ही जबाबदारी; जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणार : सुनेत्रा पवार

0

पुणे : Sunetra Ajit Pawar | माझ्या सामाजिक कार्याची सुरुवातच मी काटेवाडी गावातून केली आहे. त्यामुळे मला गावापासून शहरापर्यंतच्या प्रश्नांची जाण आहे. या प्रश्नांची सोडवणुक करणं ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवूनच मी काम करत राहीन अशी ग्वाही बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार (Mahayuti Candidate) सुनेत्रा पवार यांनी दिली.

सुनेत्रा पवार यांनी पुरंदर-हवेली मतदारसंघातील (Purandar Vidhan Sabha) वडकी, देवाची उरुळी, हांडेवाडी, होळकरवाडी, अवताडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी आदी भागांचा दौरा केला. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, मोनिका हरगुडे, गणेश ढोरे, संदिप हरपळे, स्नेहल दगडे, स्वाती ठोंबरे, प्रशांत मोडक, प्रशांत भाडळे, आकाश बहुले, राहुल चोरघडे, प्रजित हरपळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणुक व्हावी हा अजितदादांचा आग्रह असतो. त्यांच्या कामाचा आवाका आणि पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास हाच मुद्दा घेवून मी ही निवडणुक लढवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्नांची सोडवणुक करण्यावर आपला भर असेल असेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी नमूद केले.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीची वज्रमूठ घट झाल्याचं आपण पाहतो. ही एकजूट कायम ठेवून सर्वांनी आपल्या भागातून घड्याळाला अधिकाधिक मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या उज्वल भवितव्यासाठी घड्याळाला अधिकाधिक मतदान करुन आपल्या हक्काच्या व्यक्तीला खासदार म्हणून तुम्ही संसदेत पाठवाल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी आजच्या दौऱ्यादरम्यान, नागरीकांच्या भेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी नागरीकांच्या अडचणी समजून घेवून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.