Police Personnel Suspended In Pune | आमदार महेश लांडगे यांच्याशी गैरवाजवी भाषा, पोलीस कर्मचारी निलंबित

0

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Police Personnel Suspended In Pune | भोसरीचे (Bhosari Vidhan Sabha) आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्याशी फोनवर गैरवाजवी शब्द वापरुन आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यातील (Lonikand Police Station) पोलीस कर्मचारी अमित अरुण देशमुख (Amit Arun Deshmukh) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (Vijaykumar Magar DCP) यांनी हे आदेश काढले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका जमिनीच्या वादाबाबत राजेश सांकला, रमेश कावेडिया, जगदीशप्रसाद आगरवाल यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी देशमुख यांच्याकडे होती. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी फोनवर संपर्क साधला.

अमित देशमुख यांनी महेश लांडगे हे लोकप्रतिनिधी असताना कोणतेही भान न ठेवता मराठी मणुस हा एक ब्लॅकमेलर आहे, अशा प्रकारचे गैरवाजवी शब्द वापरुन त्यांच्याशी आक्षेपार्ह भाषा केली. याबाबतची तक्रार आल्यानंतर अमित देशमुख यांची खात्यामार्फत चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.