Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खुन प्रकरण : आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदत वाढ

0

पुणे : – Sharad Mohol Murder Case | पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणातील 15 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने पुणे पोलिसांना (Pune Police) 30 दिवसांची मुदत वाढ दिली आहे. मोहोळ खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी गुन्हे शाखेकडून (Pune Crime Branch) 90 दिवसांची मुदत वाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात केला होता. यावर शनिवारी (दि.30 मार्च) रोजी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने (Pune Court) पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदत वाढ दिली आहे. (30 days extension for Pune Police to file charge sheet In Sharad Mohol Murder Case)

शरद मोहोळ खुन प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 16 जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) Pune Police MCOCA Action कारवाई केली आहे. गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार गणेश मारणे (Ganesh Marne) आणि विठ्ठल शेलार (Vitthal Shelar), तसेच साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (Sahil alias Munna Santosh Polekar), नामदेव महिपती कानगुडे (Namdev Mahipati Kangude), अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे (Amit alias Amar Maruti Kangude), चंद्रकांत शाहू शेळके (Chandrakant Shahu Shelke), विनायक संतोष गव्हाणकर (Vinayak Santosh Gavankar), विठ्ठल किसन गांदले (Vitthal Kisan Gandle), ॲड. रवींद्र पवार (Adv Ravindra Vasatrao Pawar), ॲड. संजय उडान (Adv Sanjay Rambhau Udhan), रामदास ऊर्फ वाघ्या मारणे (Ramdas Alias Waghya Marne), धनंजय मारुती वटकर (Dhananjay Maruti Vatkar), सतीश संजय शेडगे (Satish Sanjay Shedge), नितीन अनंता खैरे (Nitin Anantha Khaire), आदित्य विजय गोळे (Aditya Vijay Gole), संतोष दामोदर कुरपे (Santosh Damodar Kurpe) यांना अटक केली असून आरोपी सध्या येरवडा कारागृहात (Yerawada Jail) न्यायालयीन कोठडीत आहेत.

मुख्य सुत्रधार गणेश मारणे वगळता इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदत वाढ मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदत वाढ दिली आहे. उर्वरित 60 दिवसांची मुदत वाढ मिळावी यासाठी पोलिसांकडून विशेष मोक्का न्यायालयात अर्ज करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे (ACP Sunil Tambe) गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

शनिवारी न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील अॅड. केतन कदम (Adv Ketan Kadam) यांनी मुदतवाढ देण्यास विरोध केला. पोलिसांनी तांत्रिक तपासाचे कारण सांगून मुदतवाढ मिळावी यासाठी अर्ज केला आहे. शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. पोलिसांनी वेळेत आरोपपत्र दाखल केल्यास खून प्रकरणातील आरोपींच्या वतीने जामीन अर्ज सादर करण्यात येईल, असे अॅड. कदम यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.