Tanaji Deshmukh Pune | उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस दलातील तानाजी देशमुख यांचा ‘सेवा रत्न पुरस्कारा’ने गौरव

0

पुणे : – Tanaji Deshmukh Pune | उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस दलातील तानाजी दादासाहेब देशमुख यांचा ‘सेवा रत्न पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. रक्षक ग्रुपच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. तानाजी देशमुख हे कर्तव्यनिष्ठ आणि आपल्या कर्तव्याची जाणीव असणारे एक पोलीस, एक खेळाडू एक योद्धा आणि एक जीव ओलीस धरून लोकांचे रक्षण करणारे खरे रक्षक आहेत, त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

तानाजी देशमुख यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव योग्य रीतीने या समाजापुढे मांडण्याचे काम केलं आहे. समाजात आलेले अनेक संकटे असतील अनेक प्रकारचे गैरसमजातून घडलेले अनुचित प्रकार असतील या सर्वांना आळा घालत त्यांनी एक वेगळा आदर्श या समाजात निर्माण केला. देशमुख हे पोलीस दलात कार्यरत असून त्यांनी सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळून विविध लोकांची कामे मार्गी लावली. तसेच खेळाडू घडवण्याचं देखील काम आपल्या माध्यमातून गेले अनेक वर्ष करत आहेत.

मुलींसाठी वेगवेगळे उपक्रम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये उभे राहून उंच आकाशी झेप घ्यावी इथपर्यंत त्यांनी प्रयत्न केले. अनेक शाळा महाविद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. या सर्व गोष्टी एक पोलीस म्हणून आणि एक रक्षक म्हणून समाजासाठी फार मोलाच्या ठरल्या. कोरोना सारख्या महाभयंकर काळामध्ये त्यांनी अनेक गोरगरिबांना केलेली मदत केली आहे. वयोवृद्धांना केलेली मदत असेल किंबहुना बेघर झालेल्या जनावरांसाठी त्यांनी मदत केली आहे.

समाजा मूळे आपलं भलं नाही तर आपल्यामुळे समाजाचं भलं झालं पाहिजे या नितिमत्ताचे असणारे तानाजी देशमुख यांनी केलेल्या या सर्व गोष्टींची दखल घेऊन रक्षक ग्रुप महाराष्ट्र यांनी त्यांना 2024 वर्षाचा राज्यस्तरीय सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.