Pune News | 6 एप्रिल रोजी ‘सत्संग सिनर्जी’ कार्यक्रम; पर्यावरणस्नेही,सुरक्षित,कार्यक्षम बांधकामांसाठी मंथन

0

पुणे : Pune News | कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया (क्रेडाई),इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी),इंडियन प्लम्बिंग असोसिएशन (आयपीए),फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (एफएसएआय) आणि ‘द इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स ‘(इशरे) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सत्संग सिनर्जी’ हा कार्यक्रम दि.६ एप्रिल २०२४ रोजी पुण्यात होणार आहे.’सत्संग सिनर्जी’च्या माध्यमातून पर्यावरण स्नेही,सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम बांधकामासाठी परस्पर सहकार्याला चालना देण्यात येणार आहे.बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रात शाश्वत कार्यपद्धतींना परस्पर सहकार्याने कशी चालना देता येऊ शकते, यावर विचारमंथन करण्यासाठी आणि प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रमुख घटक या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाचे संचालक अविनाश पाटील,मराठा चेंबरच्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फौंडेशन (एमईसीएफ)चे अध्यक्ष प्रदीप भार्गव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि.६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर येथे होणार आहे.
कार्यालयांचा सर्वात मोठा समूह असणारा सुरतचा डायमंड बोर्स प्रकल्प,गुंतागुंतीच्या आणि अनोख्या प्रकल्पांवरील केस स्टडी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नेट-झिरो उपक्रमांवरील चर्चा आणि ऊर्जा सक्षम प्रकल्प केस स्टडी सह विविध विषयांचा समावेश या कार्यक्रमात असेल. याशिवाय हरित(पर्यावरण स्नेही) इमारतींच्या फायद्यांविषयी सादरीकरणही होणार आहे.

सुजल शाह या कार्यक्रमाच्या निमंत्रक असून आयोजन समितीमध्ये जे.पी.श्रॉफ (क्रेडाई एक्स्पो अध्यक्ष), रणजित नाईकनवरे (क्रेडाई ,पुणे अध्यक्ष), डॉ. पूर्वा केसकर (आयजीबीसी, पुणे अध्यक्ष), नीलेश गांधी (आयपीए, पुणे अध्यक्ष), आशुतोष जोशी (इशरे,पुणे अध्यक्ष), अर्चना गव्हाणे (एफएसएआय, पुणे अध्यक्ष) समावेश आहे.झायलेम, ओरिएंट फायर कर्टन्स, रेनोटेक एअर इंजिनीअरिंग आणि एमएफएस हे इव्हेंट पार्टनर आहेत.कार्यक्रमासाठी नोंदणी विनामूल्य आहे. इच्छुक व्यक्तीनी https://allevents.in/pune/satsang-synergy या लिंकचा वापर करून नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.