Pune Court News | पुणे : पार्किंगच्या वादातून खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला जामीन मंजूर

पुणे : – Pune Court News | चंदननगर परिसरात (Chandan Nagar Police Station) पार्किंगच्या वादातून एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). हा प्रकार 17 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास खराडी परिसरातील तुकाराम नगर (Tukaram Nagar Kharadi) येथे घडला होता. याप्रकरणातील आरोपी नयन नितीन गायकवाड Nayan Nitin Gaikwad याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एन. मरे (Judge AN Mare) यांनी जामीन मंजूर केला आहे.

चंदननगर परिसरात गाडी पार्किंगच्या वादातून गाड्यांची तोडफोड करून एक चारचाकी गाडी जाळण्यात आली. यावेळी एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशन येथे आयपीसी कलम ३०७, ३०८, ४२७, ४३५, १४३, १४७, १४८, १४९ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार एकूण १३ आरोपींविरुद्ध 18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यात पोलिसांनी तपासामध्ये नयन नितीन गायकवाड या आरोपीला अटक केली होती. त्याने ॲड. मजहर मुजावर (Adv. Mazhar Mujawar) व ॲड. प्रमोद धुळे (Adv. Pramod Dhule) यांच्या मार्फत जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथे दाखल केला होता.

या गुन्ह्यामध्ये आरोपी याचा कोठेही सक्रिय सहभाग नाही तसेच आरोपी याने गाडी जाळली नसून या घटनेमध्ये महिलेस कोणतीही जखम झालेली नाही व आरोपीकडून काहीही जप्त करण्यात आले नाही असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला, त्यास सरकारी वकील व तपास अधिकारी यांनी तीव्र विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एन. मरे यांनी आरोपीला जामीन मंजूर केला.