Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची काँग्रेस भवन येथे नियोजन बैठक संपन्न

0

पुणे: Pune Lok Sabha Election 2024 | पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Pune Congress) वतीने आज काँग्रेस भवन (Congress Bhavan Pune) येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भात आज दु. १२.०० वा., शहर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व त्यानंतर दु. १.०० वा., महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली.

सदर बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भांत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभा निहाय निवडणुक कचेरी टाकणे, शहर व विधानसभा निहाय समन्वय समिती तयार करणे, दि. २९ मार्च रोजी सायं. ५.०० वा., इंडिया फ्रंट आघाडीतील घटक पक्षांसोबत बैठकीचे आयोजन, पत्रकामध्ये कोणकोणत्या मुद्दांचा समावेश असावा, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) विधानसभा निहाय निरिक्षक नेमणे तसेच निवडुकीच्या दृष्टीने विविध कमिट्या तयार करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना भरघोस मतांनी निवडुन आणण्याचा निर्धार करण्यात आला.

सदर बैठकीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi Congress), रमेश बागवे (Bagwe Ramesh), ॲड.अभय छाजेड (Abhay Chhajed), कमल व्यवहारे (Kamal Vyavahare), दिप्ती चवधरी (Dipti Chaudhari), संजय बालगुडे (Sanjay Balgude), दत्ता बहिरट (Datta Bahirat), अजित दरेकर (Ajit Darekar), अमीर शेख, त्याचबरोबर शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट – Shivsena UBT) विभाग प्रमुख गजानन थरकुडे (Gajanan Tharkude), संजय मोरे (Sanjay More Shivsena), कल्पना थोरवे (Kalpana Thorve), राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट – Sharad Pawar NCP) अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap), अंकुश काकडे (Ankush Kakade), रविंद्र माळवदकर (Ravindra Malvadkar) आदींसह महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.