Sadanand Date | मराठी पाऊल पडते पुढे! पुण्याचे सुपुत्र सदानंद दाते NIA च्या महासंचालकपदी

0

मुंबई : – Sadanand Date | महाराष्ट्राचे सुपुत्र आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती राष्ट्रीय तपास संस्थेच्या National Investigation Agency (NIA) महासंचालकपदी झाली आहे. मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. 26/11 चा हल्ला झाला तेव्हा अतुलनीय शौर्य दाखवणारे अधिकारी म्हणजे सदानंद दाते. त्यांना आता मोदी सरकारने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

सदानंद दाते हे 1990 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरमधील आयपीएस अधिकारी आहेत. अतिशय कुशल अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. दाते सध्या महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आहेत. यापूर्वी त्यांनी मिरा भायंदर, वसई, विरार आयुक्तालयाचे आयुक्त, मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांनी धडाडीची कामगिरी बजावली होती. कामा हॉस्पिटल येथे दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या महिला व मुलांची सुटका दाते यांच्यामुळे होऊ शकली होती. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले होते. दाते यांची ओळख अत्यंत चिकाटीचे अधिकारी अशी आहे. मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत काम करत असताना ते सकाळी साडे आठ ते रात्री साडे नऊ पर्यंत कार्यालयात असायचे. मिरा भायंदर, वसई-विरार हे आयुक्तालय पूर्ण उभे करण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

सदानंद दाते यांनी पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट केली आहे आणि ते मुळचे पुण्याचे आहेत. ते मागील 30 वर्षाहून अधिक काळ पोलीस सेवेत कार्य़रत आहेत. पोलीस सेवेतल्या विविध अनुभवांवर त्यांनी ‘वर्दीतील माणसांच्या नोंदी’ हे पुस्तक लिहिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.