Eknath Shinde-Ajit Pawar | महायुतीच्या जागावाटपात CM शिंदें ठरले वरचढ, मिळवल्या 15 जागा, अजित पवारांच्या पदरी निराशा

0

मुंबई : Eknath Shinde-Ajit Pawar | महायुतीमध्ये भाजपाने (Mahayuti BJP Candidate) सर्वाधिक जागा आपल्याकडे खेचत दोन्ही मित्रपक्षांना मोजक्या जागा दिल्या. त्यातही सुरूवातीला एकनाथ शिंदे यांना दोन आकडीही जागा मिळणार नाहीत, असे बोलले जात होते. मात्र, आता शिंदेंनी तब्बल १५ जागा मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अजित पवारांना अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्या चारपैकीही दोन जागा घरच्या दोन बाहेरच्या आहेत. यामुळे अजित पवारांच्या पक्षामध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

महायुतीमधील जागावाटपांचे समीकरण आता मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी जवळपास स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

महायुतीच्या जागावाटपात कोणाला किती जागा मिळणार, याबाबत साशंकता होती. शिंदेंच्या शिवसेनेला (Eknath Shinde Shivsena) दोन अंकी जागा मिळवण्यात अपयश येईल, असा अंदाज सुरुवातीला होता. मात्र महायुतीच्या जागावाटपात तब्बल १५ जागा आपल्याकडे खेचण्यात शिंदेंना यश आले आहे. तर दुसरीकडे, अजित पवारांच्या पदरी निराशा आली आहे.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने बारामती (Baramati Lok Sabha), शिरूर (Shirur Lok Sabha), रायगड (Raigad Lok Sabha) आणि सातारा (Satara Lok Sabha) या चार जागा मिळवल्या होत्या, या चार जागा आणि आणखी शिवसेनेच्या वाट्याच्या काही जागा आपल्याला मिळतील अशी अपेक्षा अजित पवार गटाला होती.

मात्र प्रत्यक्षात महायुतीचे जागावाटप झाल्यानंतर अजित पवारांना साताऱ्याची जागा भाजपला सोडावी लागली. तसेच परभणीची जागा रासपच्या महादेव जानकरांना (Mahadev Jankar) द्यावी लागली. दावा केलेल्या माढा आणि नाशिकच्या (Nashik Lok Sabha) जागाही मिळाल्या नाही.

इतकेच नव्हे तर शिरूरच्या जागेवरही शिंदे गटातून आलेल्या आढळराव पाटलांना उमेदवारी द्यावी लागली. यामुळे प्रत्यक्षात दोनच जागा अजित पवारांना मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांच्या हाती काहीच लागलेले नाही, यामुळे पक्षातील नेते आणि उमेदवारीसाठी इच्छूक असलेले नेते नाराज असल्याची चर्चा आहे.

महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेल्या जागा

रामटेक
बुलढाणा
यवतमाळ वाशीम
हिंगोली
कोल्हापूर
हातकणंगले
संभाजीनगर
मावळ
शिर्डी
नाशिक
कल्याण
ठाणे
मुंबई उत्तर पश्चिम
मुंबई दक्षिण मध्य
मुंबई दक्षिण

महायुतीत अजित पवारांना मिळालेल्या जागा

बारामती
शिरूर
रायगड
धाराशिव

Leave A Reply

Your email address will not be published.