Pune Sadashiv Peth Crime | पुणे : सदाशिव पेठेतील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी

0

पुणे : Pune Sadashiv Peth Crime | पुण्यातील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Vitthal Rukimini Mandir Pune) अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी गाभाऱ्यात असलेल्या कपाटातून देवांच्या मुर्ती व भिंतीवर असलेले चांदीचे मखर चोरून नेले. हा प्रकार 8 मार्च रोजी रात्री तीनच्या सुमारास सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत गौरव ज्ञानेश्वर सिन्नरकर (वय-38 रा. सदाशिव पेठ, खजिना विहीर चौक, पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन 25 ते 30 वर्षे वयोगटातील तीन चोरट्यांवर आयपीसी 457, 380, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील सदाशिव पेठेत प्रसिद्ध खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. पुण्यातील जुन्या मंदिरांपैकी एक असलेल्या या मंदिरात प्राचीन मूर्ती देखील आहेत. आठ मार्चच्या रात्री तीन अज्ञात व्यक्ती मंदिर परिसरात आले. त्यांनी मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या कपाटाचे कुलुप तोडून प्राचीन चांदीच्या मुर्ती चोरून नेल्या. यामध्ये विठ्ठल रुक्मिणी, गणपती आणि तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचा समावेश आहे. याशिवाय या चोरट्यांनी मंदिरातील भिंतीवर असलेलं चांदीचे मखर असा एकूण 41 हजार 500 रुपये किंमतीच्या वस्तू चोरून नेल्या.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे (ACP Sainath Thombre), वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ (Sr PI Deepali Bhujbal), पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके (PI Arun Ghodke), सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर (API Tukaram Nimbalkar) यांनी घटनास्थळी धाव घेतली. पढील तपास पोलीस उपनिरीक्षक फरताडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.