Pune Hadapsar Crime | पुणे : अत्याचारातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, आरोपीला अटक

0

पुणे : – Pune Hadapsar Crime | अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यासोबत जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार (Pune Rape Case) केला. याच अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली व तिने नुकताच बाळाला जन्म दिला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) संशयित तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार जुन 2023 ते जुलै 2023 या कालावधीत शेवाळवाडी (Shewalwadi Hadapsar Pune) येथे घडला आहे.

याबाबत लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरात राहणाऱ्या पीडित 15 वर्षाच्या मुलीने रविवारी (दि.24) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अजय मल्लाप्पा मदिनकरी (वय-18 रा. शेवाळवाडी, ता. हवेली) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 506 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा (POCSO Act) दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्या बालपणाचा गैरफायदा घेतला. तिला धमकावत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला. याबाबत कोणाला काही सांगितले तर लहान भावांना जीवे मारून टाकण्याची धमकी पीडितेला दिली. त्यानंतर त्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.