Kothrud Pune Crime News | कोथरूडमध्ये नोकराच्या प्रसंगावधानाने फसला दरोड्याचा प्रयत्न; तीन दरोडेखोर जेरबंद

0

पुणे : Kothrud Pune Crime News | नोकराच्या प्रसंगावधानाने चांदणी चौकातील (Chandani Chowk Pune) कलासागर सोसायटीतील (Kalasagar Society Kothrud) दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. मालक गावी गेल्यांनतर नोकरांना धमकावून दरोडा टाकण्याचा प्रकार फसला. यावेळी तिघांनी तिजोरी बाहेर नेत असताना नोकराने प्रसंगावधान दाखवत बाहेरून कडी लावून घेतली. आरडाओरडा केल्यानंतर जवळील रहिवासी आले त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (Robbery In Pune)

दरोडेखोरांना पोलिसांनी शरण येण्यास सांगून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तिघांनाही ताब्यात घेण्यात आले . गुरुवारी रात्री उशिरा याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ताब्यात घेतलेले चोरटे हे आइस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

चांदणी चौक परिसरात कलासागर नावाची सोसायटी आहे. याच सोसायटीत केटरिंग व्यावसायिक पुरोहित वास्तव्याला आहेत. कामानिमित्त पुरोहित कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. दरम्यान त्याठिकाणी नोकर राहत होते.

गुरुवारी दुपारी चोरटे घरात घुसले. त्यांनी नोकरांना तिजोरी कुठे असल्याचे धमकावत विचारले. त्यावेळी तीनही चोरट्यांनी तिजोरी बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी नोकराने प्रसंगावधान दाखवत बाहेरून कडी लावून घेतली त्यामुळे हा प्रकार रोखला गेला. याबाबत परिमंडळ तीन चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.