Pune Kondhwa Crime | भररस्त्यात महिलेचा विनयभंग, कोंढवा भागातील घटना

Molestation Case
25th March 2024

पुणे : – Pune Kondhwa Crime | पुणे शहरामध्ये रस्त्याने जाणाऱ्या महिलांसोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation Case) करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोंढवा परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला अश्लील स्पर्श करुन विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि.23) रात्री आठ ते नऊ या दरम्यान कोंढवा परिसरातील भगवा चौकात (Bhagwa Chowk Kondhwa) घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कोंढवा बुद्रुक येथे राहणाऱ्या 26 वर्षीय विवाहित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन टिंकु कुमार सिंग (पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 354, 354 (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी रात्री घरातील सामानाची खरेदी करण्यासाठी सासु व दोन मुलांसोबत भगवा चौकात गेल्या होत्या. सामानाची खरेदी करुन घरी जात असताना आरोपीने महिलेला अश्लील स्पर्श करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. महिलेने तक्रार देताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात (API Sachin Thorat) करीत आहेत.