Pankaja Munde On Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांनी घेतलेली भूमिका ही स्वागतार्ह, पंकजा मुंडे यांचे अपक्ष मराठा उमेदवारांबाबत भाष्य

0

मुंबई : Pankaja Munde On Manoj Jarange Patil | अत्यंत साधेपणातून उभे राहिलेले आंदोलन आणि त्यातून मनोज जरांगे यांनी घेतलेली भूमिका ही स्वागतार्ह आहे. यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे यांनी मी कोणत्याही राजकीय पक्षासोबत उभा राहणार नाही, हे सांगितले होते. जरांगे यांनी ते पुन्हा सिद्ध केले. शेवटी निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार देणे न देणे हा त्यांचा विषय आहे, असे म्हणत भाजपा नेते (BJP Leader) पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली.

आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची सर्वात मोठी बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) प्रत्येक मतदार संघातून एक अपक्ष उमेदवार उभा करण्याचे मराठा समाजाने (Maratha Community) ठरवले आहे. याबाबत वरील प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. आजच्या मराठा समाजाच्या बैठकीत पंकजा मुंडे यांचा उल्लेख आला.

कारण, शनिवारी पंकजा मुंडेंचा ताफा जात असताना काही मुलांनी काळे झेंडे दाखवत एक मराठा, लाख मराठा, घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यावरुन जरांगे यांनी आजच्या बैठकीत सरकारवर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी पोलिसांकडे केली. ती लहान मुले आहेत. केवळ झेंडे दाखवले म्हणून लहान मुलांवरती गुन्हे दाखल करू नका, अशी विनंतीच पंकजा यांनी पत्रातून पोलिसांना केली आहे. दरम्यान, भाजपाकडून पंकजा मुंडेंना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी मतदारसंघत्तत प्रचाराला सुरुवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.