MLA Ravindra Dhangekar On Muralidhar Mohol | ‘मोहोळ यांनी पहिलवानांना कधी अर्धा लिटर दूध दिले नाही; बिल्डरांना मात्र पाजले’ – रवींद्र धंगेकर (Videos)

0

पुणे : MLA Ravindra Dhangekar On Muralidhar Mohol | काँग्रेसचे (Congress) पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar NCP) यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना धंगेकर यांनी भाजपा (BJP) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. दिवंगत भाजपा नेते गिरीश बापट (Late MP Girish Bapat) आणि मुरलीधर मोहोळ यांची तुलनाच होऊ शकत नाही. तसेच मोहोळ यांनी पहिलवानांना कधी अर्धा लिटर दूध दिले नाही, बिल्डरांना मात्र पाजले, अशी टीका धंगेकर यांनी केली.

रवींद्र धंगेकर म्हणाले, दिवंगत खासदार गिरीश बापट लोकनेते होते. सर्व पक्षातील नेत्यांशी, कार्यकत्र्यांशी त्यांचे चांगले सबंध होते. ते मोठ्या उंचीचे नेते होते. त्यामुळे त्यांची आणि मोहोळ यांची तुलना होऊ शकत नाही. मोहोळ हे रस्त्यावर कधीही न फिरलेले नेते आहेत. बापट यांचे कार्यालय कोणी फोडले, हे पुणेकर अद्याप विसरलेले नाहीत.

मोहोळ यांनी प्रचारासाठी पहिलवान आणले आहेत, याबाबत रवींद्र धंगेकर म्हणाले, त्यांच्याकडे पहिलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत. वास्तविक, पहिलवान हे सर्वसामान्य कुटुंबातील असतात. त्यामुळे ते मोहोळ यांना मदत करणार नाहीत. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने ते आम्हालाच मदत करतील. मोहोळ यांनी आजवर पहिलवानांना अर्धा लिटर दूध कधी दिले नाही; त्यांनी केवळ बिल्डरांना दूध पाजले आहे.

आबा बागुल यांच्या नाराजीवर धंगेकर म्हणाले, बागुल (Aba Bagul) पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना अनेक वर्षांचा राजकारणाचा, समाजकारणाचा अनुभव आहे. ते अत्यंत गोड, मृदू स्वभावाचे नेते आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, आम्ही सर्वजणांकडून त्यांची नाराजी दूर करण्यात येईल.

धंगेकर पुढे म्हणाले, काँग्रेसकडे वीस जणांनी उमेदवारी मागितली होती. त्यातून एकाची निवड दिल्लीतून झाली. ही केवळ निवडणूक नाही; लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सुरू असलेली लढाई आहे. त्यामुळे बागूल आणि सर्वच नेते आपापल्या भागात, शहरात मेहनत घेऊन मोठे मताधिक्य काँग्रेसकडे खेचून आणतील, असा विश्वास आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.