Pune Mundhwa Crime | मोबाईल देण्यास नकार दिल्याने चाकूने वार, मुंढवा पोलिसांकडून चौघांना अटक

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Mundhwa Crime | रिक्षातून आलेल्या चार जणांनी एका तरुणाकडे मोबाईलची मागणी केली. मात्र, त्याने मोबाईल देण्यास नकार दिल्याने चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच धारदार चाकूने हातावर वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police Station) चार जणांना अटक केली आहे (Robbery In Pune) . हा प्रकार गुरुवारी (दि.7) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास केशवनगर मुंढवा (Keshav Nagar Mundhwa) येथे घडला.

सारंग गायकवाड उर्फ साऱ्या (वय-19), ऋषीकेश उर्फ भोऱ्या गोवर्धन कांबळे (वय-23 रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे), अभिषेक उर्फ अभय उर्फ धनी धनराज गायकवाड (रा. म्हसोबा मंदीराजवळ), हेमंत उर्फ लाल्या विलास गायकवाड (वय-21 रा. मुंगसेआळी, केशवनगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 394, 324, 504, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत आदित्य दत्तात्रय कांबळे (वय-22 रा. जांभळे प्लॉट, शिंदे वस्ती, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.(Pune Mundhwa Crime)

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध
सुरू केला. आरोपींचा शोध घेत असताना शुक्रवारी (दि.8) पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना मिळालेल्या माहितीवरुन
सारंग गायकाड व ऋषीकेश कांबळे यांना अटक केली. तसेच फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार हेमंत
झुरंगे यांना शनिवारी (दि.9) मिळालेल्या माहितीवरुन अभिषेक गायकवाड व हेमंत गायकवाड यांना अटक केली. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक
विभाग मनोज पाटील यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाबासोबर निकम,
सहायक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब टापरे, सहायक पोलीस फौजदार संतोष जगताप, पोलीस अंमलदार हेमंत झुरंगे,
दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, महेश पाठक, दिपक कदम, राहूल मोरे, स्वप्निल रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील
यांच्या पथकाने केली.

Pune Parvati Crime | पुणे : खाऊ देण्याच्या बहाण्याने सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Pune Hadapsar Crime | पुणे : अल्पवयीन मुलीला अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देत विनयभंग

Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Lashkar Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग, स्कूल व्हॅन चालकाला अटक

Merged Villages In PMC | समाविष्ट 34 गावांतील मिळकत कर थकबाकी आणि शास्ती माफीचे आश्‍वासन हे केवळ ‘राजकिय’ फायद्यासाठीच!

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात करार ! ‘पुनीत बालन ग्रुप’ करणार खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत

Leave A Reply

Your email address will not be published.