Pune Crime Branch | मोक्का गुन्ह्यात दोन वर्ष फरार असलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखेकडून अटक
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime Branch | वारजे पोलीस ठाण्यातील (Warje Malwadi Police Station) रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Pune Police Record) मोक्का कारवाई (MCOCA Action) केल्यानंतर फरार झाला होता. पोलीस मागील दोन वर्षापासून शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell Pune) आरोपीला सोलापूर (Solapur) येथून अटक केली आहे. सिद्राम उर्फ अभी रमेश मंजिली (वय- 24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वारजे पोलीस ठाण्यात 2022 मध्ये दाखल असलेल्या आयपीसी 307, 504, 506, 34, आर्म ॲक्ट गुन्ह्यात
मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्यात आला होता. मोक्का कारवाई झाल्यानंतर आरोपी मंजिले फरार झाला होता. पोलीस त्याचा दोन वर्षापासून शोध घेत होते. आरोपी सिद्राम उर्फ अभी मंजिले हा सोलापूर, रविवार पेठत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस नाईक राजेंद्र लांडगे व पोलीस हवालदार अमोल आवाड यांना मिळाली. माहितीची खातरजमा करून खंडणी विरोधी पथक एक चे पोलीस उप निरीक्षक यशवंत ओंबासे व टीमने सोलापूर येथे जाऊन आरोपीला बालाजी चौकात सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपासासाठी वारजे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.(Pune Crime Branch)
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade), पोलीस उप आयुक्त गुन्हे
अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनील तांबे (ACP Sunil Tambe) व
खंडणी विरोधी पथक 1 चे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (PI Krantikumar Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक यशवंत ओंबासे, पोलीस हवलदार सयाजी चव्हाण, अमोल आवाड, राजेन्द्र लांडगे, अमर पवार
यांच्या पथकाने केली.
Pune Parvati Crime | पुणे : खाऊ देण्याच्या बहाण्याने सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
Pune Hadapsar Crime | पुणे : अल्पवयीन मुलीला अंगावर अॅसिड फेकण्याची धमकी देत विनयभंग
Pune Lashkar Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग, स्कूल व्हॅन चालकाला अटक