Pune Crime News | पुणे: कॅम्प, कात्रज, धायरी व वडगाव शेरी परिसरात घरफोडी, सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये पुणे कॅम्प (Pune Camp), कात्रज (Katraj), धायरी (Dhayari) व वडगाव शेरी परिसरात (Vadgaon Sheri) चोरट्यांनी बंद घरात चोरी करुन रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिने असा एकूण सात लाखांचा ऐवज चोरून नेला (House Burglary In Pune). याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे कॅम्प परिसरातील राजस्थान भवन जवळ असलेल्या दुकानाचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी डिझाईन मारण्याच्या मशिनचे लॉक तोडून साठ हजार रुपये किंमतीचे चांदिचे दागिने व रोख रक्कम घरफोडी करुन चोरुन नेली. हा प्रकार बुधवारी (दि.13) सकाळी साडे आठच्या सुमारास उघडकीस आला आहे. याबाबत भरत शंकर सुतार (वय-53 रा. शिवनेरी नगर, कोंढवा) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune Crime News)
घरफोडीची दुसरी घटना कात्रज भागातील संतोष नगर येथील राजगड कॉलनी येथे घडली आहे. याबाबत रमजानबी दाऊद शेख (वय-45 रा. संतोष नगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्य़ादी यांनी मंगळवारी (दि.12) सकाळी साडेअकराच्या सुमारास घराला कुलुप लावून बाहेर गेल्या होत्या. चोरट्याने घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 24 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुपारी तीन वाजता फिर्यादी घरी अल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
घरफोडीची तिसरी घटना धायरी येथील बेनकर वस्ती येथे मंगळवारी (दि.12) सकाळी पावणे बारा ते दुपारी
सव्वादोन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याबाबत ललीत दत्तात्रय सपकाळ (वय-35 रा. समर्थ हाईट्स, बेनकरवस्ती, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या घराला कुलुप लावून आईला आनंदनगर येथील दवाखान्यात घेऊन गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील बेडरुममधील कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 52 हजार रुपांचा ऐवज चोरुन नेला. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरी आले. त्यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.
येरवडा परिसरातील वडगाव शेरी येथे बंद घरातून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 48
हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार मंगळवारी (दि.12) सकाळी आठ ते सायंकाळी सहा या दरम्यान
घडला आहे. याबाबत महादेवी शंकर राठोड (वय-36) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune Parvati Crime | पुणे : खाऊ देण्याच्या बहाण्याने सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
Pune Hadapsar Crime | पुणे : अल्पवयीन मुलीला अंगावर अॅसिड फेकण्याची धमकी देत विनयभंग
Pune Lashkar Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग, स्कूल व्हॅन चालकाला अटक