Pune Bibvewadi Crime | पुणे : पोलिसांना टिप देत असल्याच्या संशयावरुन तरुणाला मारहाण, सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Bibvewadi Crime | पोलिसांना टिप देत असल्याच्या संशयावरुन दोघांनी एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच हातातील लाकडी दांडके हवेत फिरवून लोकांना धमकी देऊन परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police Station) एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली आहे (Two Criminal Arrest). हा प्रकार सोमवारी (दि.11) रात्री पावणे बाराच्या सुमारास बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रोडवर घडला आहे.

याबाबत स्वप्नील रविंद्र कांबळे (वय-24 रा. राजीव गांधीनगर, हुनमंत चाळ, बिबवेवाडी, पुणे) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन गौरव मारुती खंडाळे (वय-25 रा. साईनगर गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज शाळेजवळ, कोंढवा, पुणे), केतन शाम टेमकर (वय-20 रा. हनुमान चाळ, राजीव गांधीनगर, बिबवेवाडी, पुणे) यांच्यावर आयपीसी 326, 506, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी केतन टेमकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.(Pune Bibvewadi Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील व त्याचा मित्र स्वामी विवेकानंद रोडवरील भारत वाईन्स या दुकानासमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी फिर्यादी याच्या ओळखीचे आरोपी त्याठिकाणी आले. गौरव याने फिर्यादी यांना तू मुसाला का मारले अशी विचारणा केली. तर केतन याने माझी पोलिसांना टिप देतो का असे म्हणून गौरवने लाकडी दांडक्याने मारण्यास सुरुवात केली. तर केतन याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले.

केतन याने गौरवच्या हातातील लाकडी दांडके हातात घेऊन त्या ठिकाणी जमलेल्या लोकांच्या दिशेने फिरवून धमकी दिली.
त्यामुळे मदतीसाठी आलेले लोक घाबरुन पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune Parvati Crime | पुणे : खाऊ देण्याच्या बहाण्याने सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Pune Hadapsar Crime | पुणे : अल्पवयीन मुलीला अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देत विनयभंग

Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Lashkar Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग, स्कूल व्हॅन चालकाला अटक

Merged Villages In PMC | समाविष्ट 34 गावांतील मिळकत कर थकबाकी आणि शास्ती माफीचे आश्‍वासन हे केवळ ‘राजकिय’ फायद्यासाठीच!

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात करार ! ‘पुनीत बालन ग्रुप’ करणार खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत

Leave A Reply

Your email address will not be published.