Pune Wanwadi Crime | छोटा शेख सल्ला दर्गा: ‘रील’ व्हायरल करुन अफवा पसरवणाऱ्या दोघांवर वानवडी पोलिसांकडून FIR

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Wanwadi Crime | कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्गा (Pune Chota Shaikh Salla Durgah ) परिसरातील बेकायदा बांधकामावर पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) कारवाई करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले. त्यानंतर दर्ग्याच्या परिसरात मोठा जमाव जमला. जमावाचे व्हिडिओ शुटींग असलेल्या रिलवर ‘सेव्ह दर्गा वाली मज्जीद कसबापेठ’ असे लिहून इन्स्टाग्रामवर रिल व्हायरल करुन अफवा पसरवली. याप्रकरणी दोन जणांवर वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस हवालदार सर्फराज नूरखान देशमुख यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून आयान मेहबुब शेख (रा. नेहरू पार्क, काळेपडळ, हडपसर), इब्राहिम आयाज शेख (रा. सोनाई मेडिकल गल्ली, काळेपडळ, हडपसर) यांच्यावर आयपीसी 502(2), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Wanwadi Crime)

कसब्यातील हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यावर बांधकाम कारवाई होणार असल्याची अफवा पसरली.
त्यानंतर शनिवारी मध्यरात्री या भागात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले.
मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने याठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
आरोपींनी जमा झालेल्या मुस्लिम समुदायाचे व्हिडिओ शुटींग असलेल्या रिलवर ‘Save dargah wali masjid Kasbapeth’ असे लिहून रिल इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. तसेच गाणे असलेले रिल स्टोरी म्हणून ठेवून जाणीवपुर्वक अफवा पसरवून जातीय तणाव निर्माण होईल या उद्देशाने ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे (Sr PI Sanjay Patange) करीत आहेत.

Pune Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल: ठेकेदाराच्या 360 कोटी रुपयांच्या कर्जाला जामीन राहाण्याच्या प्रकरणाचा खुलासा करावा त्यानंतरच हॉस्पीटलचे भूमीपूजन करावे; शिवसेने (उबाठा)ची मागणी

Pune Bharti Vidyapeeth Crime | पुणे : वर्गात झालेल्या भांडणाच्या रागातून दहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Leave A Reply

Your email address will not be published.