PSI Suspended In Pune Pimpri | पुणे (पिंपरी) : पाच लाख खंडणी प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित

0

पुणे / पिंपरी : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – PSI Suspended In Pune Pimpri | गांजाच्या खोट्या गुन्ह्यामध्ये (Ganja Case) अडकवण्याची धमकी देऊन देहुरोड पोलिसांनी (Dehu Raod Police) कॉलेज तरुणाकडे 20 लाखांची मागणी करुन जबरदस्तीने पाच लाख रुपये खंडणी (Extortion Case) उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जणांवर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. (Pimpri Chinchwad Police)

सोहम धोत्रे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे (PSI Soham Dhotre) . धोत्रे हे देहुरोड पोलीस ठाण्यात तपास पथकात कार्यरत होते. किवळे येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला गांजाच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्या वडिलांकडून पाच लाख रुपये खंडणी उकळली. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात आयपीसी आयपीसी 363, 384, 385, 120(ब), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. (PSI Suspended In Pune Pimpri)

गुन्ह्यात पोलीस नाईक हेमंत चंद्रकांत गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला. हेमंत गायकवाड आणि सचिन शेजाळ या दोघांची दोहुरोड पोलीस ठाण्यात नियुक्त केली होती. पोलिसांच्या तपास पथकात ते कार्यरत होते. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांचा वचक न राहिल्याने गायकवाड व शेजाळ यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य केले.

देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर गुन्हे शाखेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली.
देहूरोडच्या तपास पथकाकडून अवैध धंद्यांना आळा बसवणे गरजेचे होते. मात्र, गुन्हे शाखेने अवैध धंद्यावर कारवाई केली.
या कारणामुळे पोलीस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

Pune Shivaji Nagar Police | जबरी चोरी करुन कोयते बाळगणारी टोळी शिवाजीनगर पोलिसांकडून गजाआड (Video)

Pune Police Crime Branch | पुणे: गुन्हे शाखेकडून राजधानी दिल्लीत छापेमारी, 400 किलो ‘एमडी’ जप्त; पुणे पोलिसांकडून तब्बल 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी (MD) जप्त (Videos)

Pune Police News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा कुरकुंभ येथील कंपनीवर छापा, 1100 कोटी रुपयांचे 600 किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.