ACP Mugutlal Patil | सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरुन पाच लाख रूपयाच्या लाचेची मागणी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – ACP Mugutlal Patil | फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील (Pimpri Chinchwad Police) सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील (ACP Mugutlal Patil) यांच्या सांगण्यावरुन एका व्यक्तीला एक लाखाची लाच घेताना पुणे लाचलचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) अटक केली आहे. एसीबीच्या या कारवाईनंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. यानंतर एसीबीच्या पथकाकडून सहायक पोलीस आयुक्त पाटील यांची चौकशी केली जाणार आहे. (Pune Bribe Case)

ओंकार भरत जाधव (वय 31, रा. वास्तुव्हिवा सोसायटी, वाकड, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर) असे लाच घेताना अटक करण्यात खासगी व्यक्तीचे नाव आहे. ओंकार जाधव मोटारचालक असून त्याची व एसीपी मुगुटलाल पाटील यांच्यासोबत पूर्वीपासून ओळख आहे. एका तरुणाने एसीपी पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावरील जागेसंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तरुणाने केली होती. या अर्जाची चौकशी पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

तक्रार अर्जानुसार तक्रारदार तरुणाविरोधात गुन्हा दाखल न करणे, तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी मुगुटलाल पाटील यांच्या सुचनेवरुन ओंकार जाधव याने तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तरुणाने पुणे एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून ठरलेल्या रक्कमेपैकी एक लाखाचा पहिला हप्ता घेताने ओंकार जाधव याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आरोपी ओंकार जाधव याने सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरुन तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तपास पूर्ण झाल्यावर संबंधित सहायक पोलीस आयुक्तांना आरोपी करायचे की नाही, यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस अधीक्षक नितीन जाधव यांनी दिली.

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून कोयत्याने तोडफोड

ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी 5 लाखांची लाच घेणारे मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात सात जण जखमी (Video)

Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR (Video)

Pune Hadapsar Crime | पुण्यात सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) मुलाच्या दुकानातून 2 कोटींचे सोने पळवले

Leave A Reply

Your email address will not be published.