Ajit Pawar | “लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही” पवारांचे विधान चर्चेत

0

पुणे: Ajit Pawar | पुढच्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुक (Assembly Elections) जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार आता जागावाटपांबाबत पक्षाच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दावे – प्रतिदावे सुरु आहेत.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विधानसभा जागावाटपाबाबत भाष्य केल्यांनतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व पक्ष एकत्र बसून त्याबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी भुजबळ यांच्या वक्तव्यावरून पलटवार केल्याचेही पाहायला मिळाले.

या आरोप – प्रत्यारोपांनंतर अजित पवारांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. यावेळी बोलताना “लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, ” देश कुठे चालला आहे? जग कुठे चालले आहे? आपण कुठे चाललो आहोत? आपण जातीपातीमध्ये अडकून बसतो आहोत. ज्यावेळी आपण महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा मानतो. त्यांचा आदर्श समोर ठेवून पुढे जातो. राज्यातील काही जिल्ह्यात जातीयवादावर निवडणूक झाली. मराठा आणि इतर समाज असे काही वातावरण गावात पाहायला मिळाले” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.