Sonia Doohan on Sharad Pawar NCP | मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, सोनिया दुहान म्हणाल्या, शरद पवार आमचे नेते होते, आहेत, पण सुप्रिया सुळे…

0

मुंबई : Sonia Doohan on Sharad Pawar NCP | शरद पवार यांच्या राष्ट्रीय पातळीवरील विश्वासू महिला नेत्या आणि राष्ट्रवादीच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान अजित पवार गटात (Ajit Pawar NCP) जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत आता सोनिया दुहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी शरद पवारांवर निष्ठा कायम आहे, मी पक्ष सोडलेला नाही, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे सोनिया दुहान यांनी म्हटले आहे.

मात्र, ही प्रतिक्रिया देताना दुहान यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

सोनिया दुहान म्हणाल्या, मी पक्ष सोडलेला नाही, मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. तसे पाहायला गेले तर, ज्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या काही जणांनी वेगळा निर्णय घेतला, त्यावेळी सुप्रीया सुळेही तिथे दिसल्या होत्या. मग त्यांनीही पक्ष सोडला, असे म्हणायचे का?

धीरज शर्मांसारखे (Dheeraj Sharma) सर्वच लोक शरद पवारांना का सोडत आहेत? मी आणि धीरज शर्मा आमच्यासाठी शरद पवारच आमचे लीडर आहेत. शरद पवार आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील, असे दुहान म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करताना सोनिया दुहान म्हणाल्या, शरद पवारांची मुलगी म्हणून सुप्रीया सुळे यांच्यासाठी आम्हाला आदर आहे. पण, त्या आमच्या प्रमुख कधीच होऊ शकल्या नाहीत. लीडर होण्यात त्या कमी पडल्या.

मी लवकर पक्ष जोडण्याचा निर्णय घेईन, मी सध्या इतर कोणता पक्ष जॉईन करणार नाही, सुप्रिया सुळेंना त्यांचे मंथन करण्याची गरज आहे. लोक त्यांना का सोडून जात आहेत, याचा विचार त्यांनी करावा, असे दुहान म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.