Pune Wanwadi Crime | वानवडी पोलिसांकडून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्या उध्वस्त

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Wanwadi Crime | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर वानवडी पोलिसांनी मोहम्मदवाडी आणि काळेपडळ येथील ढेरे कंपनीजवळ हातभट्टी दारु तयार करण्याच्या भट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. ही कारवाई वानवडी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे पथकाने संयुक्त रित्या केली. (Pune Wanwadi Crime)

वानवडी पोलीस स्टेशन अंकित महंमदवाडी पोलीस चौकीच्या हद्दीत अवैध दारु गळप सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर हातभट्टी धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पलिसांनी पेट्रोलिंग करुन कंजर भट तरोडे वस्ती मोहम्मद वाडी पुणे तसेच काळेपडळ ढेरे कंपनी जवळ असलेल्या हातभट्टी दारू तयार करण्याच्या भट्टया उध्वस्त करून समूळ नायनाट केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक टोने, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे निरीक्षक पाटील व उपनिरीक्षक गुरव व इतर स्टाफ यांनी दारूच्या भट्ट्या उध्वस्त केल्या आहेत, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिली.

Pune Police News | पुणे : अवैध हातभट्टीवर गुन्हे शाखा व लोणी काळभोर पोलिसांचा छापा, 36 लाखांचे रसायन नष्ट (Video)
Pune Police MCOCA Action | हत्याराचा धाक दाखवून लुटणार्‍यांवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कठोर कारवाई ! अमन दिवेकर टोळीवर ‘मोक्का’
Pune Kondhwa Crime | जेवणाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन बलात्कार, कोंढवा परिसरातील धक्कादायक घटना

Leave A Reply

Your email address will not be published.