Pune Pimpri Accident News | ताम्हिणी घाटात बसला भीषण अपघात, २ महिलांचा मृत्यु, ५५ जखमी

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – पुण्याहून अलिबागला जाणार्या खासगी बसला ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) भीषण अपघात (Pune Pimpri Accident News) झाला असून त्यात २ महिलांचा मृत्यु (Death) झाला आहे. बसमधील ५५ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात (Pune Pimpri Accident News) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला.
पुण्याहून एम एच ०४ एफ के ६२९९ ही बस माणगावकडे जात होती. ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व ती घाटात रस्त्यावरुन खाली जाऊन उलटली. त्यात बस ही पुर्णपणे उलटी झाली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर पडणेही अशक्य झाले होते. या अपघाताची (Pune Pimpri Accident News) माहिती मिळताच माणगाव पोलीस (Mangaon Police) तातडीने घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांनी प्रवाशांना मिळेल त्या वाहनांतून माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे जखमीवर उपचार करण्यात येत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- IPS Rashmi Shukla | राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला
- Home Remedies For Knee Pain | गुडघेदुखीपासून आराम मिळवायचा असेल, तर करा ‘या’ उपायांचा अवलंब..
- Room Heater Side Effects | हिवाळ्यात रूम हीटर वापरा जपून, नाहीतर एका चूकीमुळे जाऊ शकतो तुमचा जीव…
- Health Tips – Reheating Food | ‘हे’ 5 पदार्थ पुन्हा गरम करण्याची करू नका चूक, शरीर होईल अशक्त…