Pune Rape Case | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले (Physical Relationship). तसेच खर्चासाठी वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरुपात पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2018 पासून 11 मार्च 2024 या कालावधीत खराडी बायपास (Kharadi Bypass) व अहमदनगर येथे घडला आहे.

याबाबत घोरपडी येथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि.11) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सचिन कल्याण वरठेSachin Kalyan Varthe (वय-40 रा. इंदिरानगर, शेवगाव, ता. शेवगाव) याच्यावर आयपीसी 376, 376(2), 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Rape Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन वरठे याने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे
आमिष दाखवले. तिच्याकडून खर्चासाठी वेळोवेळी रोख व आरटीजीएस स्वरुपात पैसे घेतले.
तसेच तरुणीला खराडी बायपास व अहमदनगर येथे घेऊन जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
शारीरिक संबंध ठेवतानाचे फोटो व व्हिडिओ काढून (Nude Photos And Videos) ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
पीडित तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने हाताने मारहाण करुन मानसिक त्रास दिल्याचे फिर्य़ादीत
नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

Merged Villages In PMC | समाविष्ट 34 गावांच्या सोयी सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार, अखेर समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय

PMC Property Tax | समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकी आणि शास्तीकर वसुलीला स्थगिती; लोकसभेच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यकर्ते झोपेतून जागे झाले?

Pune Kothrud Crime | किरकोळ कारणावरून तरुणावर सत्तुरने वार, कोथरुड परिसरातील घटना

Pune Metro | वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

Leave A Reply

Your email address will not be published.