Pune Police News | नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मावळते पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – राज्य सरकारने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी (दि. 31 जानेवारी) बदल्या केल्या आहेत. नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांची पुणे पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांची राज्याच्या होमगार्डच्या महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मावळते पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून गुरुवारी (दि.1) पुणे शहर पोलीस आयुक्तालयात पदभार स्वीकारला.(Pune Police News)

अमितेश कुमार यांची पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूरच्या आयुक्तपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांनी औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी मुंबई वाहतूक पोलीस शाखेच्या सहआयुक्त म्हणूनही काम केलं आहे.

रितेश कुमार भारतीय पोलिस सेवेच्या 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी 16 डिसेंबर 2022 मध्ये पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांनी 13 महिन्यांच्या कार्यकाळात शहरातील गुन्हेगारांना जरब बसवला. गुन्हेगारी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी त्यांनी मोक्का, तडीपार, एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाई केली. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध योजनाही रावबवल्या. शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यावर त्यांनी मोठा भर दिला.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर 103 दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. तसेच 118 संघटीतपणे गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.