Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल, तरुणावर FIR
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | इंन्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर तरुणाने एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) तरुणीला अश्लील मेसेज करुन शारीरिक संबंधाची (Physical Relationship) मागणी केली. मात्र तरुणीने त्याला नकार दिल्याने तरुणाने मुलीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन विनयभंग (Molestation) केला. हा प्रकार 11 डिसेंबर 2023 रोजी इंस्टाग्राम अकाऊंटवर घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत येवलेवाडी येथील 19 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.25) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन प्रथमेश गुळवे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 354(ड), 500 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात इंन्स्टाग्रामवर ओळख झाली. आरोपी फिर्यादी यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होता.
प्रथमेश याने तरुणीला मेसेज करुन तुला देण्यासाठी माझ्याकडे काही तरी आहे.
तुझ्याकडून देखील काही तरी हवे असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे शरीर सुखाची मागणी फिर्यादी यांच्याकडे केली.
आरोपीने फिर्यादीला कात्रज चौकात बोलावून शारीरिक सुखाची मागणी मागणी केली.
त्यावेळी तिने त्याला विरोध केला असता आरोपीने तरुणीचा मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअॅप वर व्हायरल केला.
यामुळे तरुणीच्या स्त्री मनास लज्जा निर्माण होऊन आरोपीने तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीवर संशय घेऊन खून, पतीवर गुन्हा दाखल; चतु:श्रृंगी परिसरातील घटना
- Pune News | गुड न्यूज! पुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता तिसरी महापालिका, जिल्ह्यातील ‘या’ गावांचा समावेश
- Pune Police MPDA Action | येरवडा परिसरातील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 97 वी कारवाई