Pune Police MPDA Action | येरवडा परिसरातील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 97 वी कारवाई

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MPDA Action | येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार शाहरुख सईद खान Criminal Shah Rukh Saeed Khan (वय- 27 रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 97 वी कारवाई आहे.
शाहरुख खान हा येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerwada Police Station) रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने लोणीकंद व येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवली आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तलवार, कोयता, यासारख्या हत्यारांसह दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर मागील तीन वर्षात 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपी शाहरुख खान याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलीस आयुक्त यांना पाठवला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शाहरुख खान याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये चंद्रपूर मध्यवर्ती कारागृह (Chandrapur Central Jail), चंद्रपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कमगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे,
पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.
- Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : इंन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीवर अत्याचार, तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
- Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : आरबीआय, सेबी मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 41 लाखांची फसवणूक
- President’s Medal | उल्लेखनीय सेवेबद्दल कारागृह सेवेतील 9 जणांना राष्ट्रपती पदक जाहीर