Pune News | गुड न्यूज! पुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता तिसरी महापालिका, जिल्ह्यातील ‘या’ गावांचा समावेश

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune News | वाढती लोकसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात लवकरच नवीन महानगरपालिका (Third Municipal Corporation in Pune) होत आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि राजगुरू नगरपरिषद हद्दीसह आजूबाजूच्या परिसरातील गावांचा समावेश करुन ही नवीन महापालिका निर्माण केली जाणार आहे. यासाठी अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव (IAS Saurabh Rao) यांच्याकडून राज्य शासनाने अहवाल मागविला आहे. याबाबतचे कामही सुरु झाले आहे. (Pune News)

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत अगोदरच अनेक गावांचा समावेश झाला असल्याने आता या महापालिकांची हद्द वाढवणे अनेक दृष्टीने अडचणीचे ठरत आहे. त्यामुळेच आता तिसरी महापालिका आकारास येत आहे.

चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच लगतच्या गावांची नवीन महापालिका निर्माण करण्याची मागणी सातत्याने होत आहे.

नव्या महानगरपालिकेसाठी चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद हद्दीतील भागांसह आजूबाजूच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याचा तपशिल घेतला जात आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, पिंपरी-चिंचवड,
पुणे महापालिका आयुक्त आणि चाकण, आळंदी, राजगुरू नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांचे अहवाल मागविले आहेत.
तसेच शासनाने अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून देखील अहवाल मागविला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.