Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीवर संशय घेऊन खून, पतीवर गुन्हा दाखल; चतु:श्रृंगी परिसरातील घटना

Pune Murder Case

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीवर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून (PUne Murder Case) केला. त्यानंतर आरोपी पती घराला बाहेरून कुलूप लावून पसार झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी साडे सातच्या पूर्वी जनवाडी जनता वसाहत येथील लाडाचा गणपती मंदिराजवळ घडला आहे. याप्रकरणी आरोपी पतीवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

रेश्मा चंदर पंतेकर (वय-30 रा. जनवाडी जनता वसाहत, पुणे) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर चंदर अशोक पंतेकर (वय-33) याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रेश्मा यांचा भाऊ राहुल राजु मंजाळकर (वय-24 रा. सुतारवाडी बस डेपो जवळ, पाषाण) यांनी गुरुवारी (दि.25) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण रेश्मा पंतेकर हिचा पती चंदर याने तिच्यावर संशय घेऊन तिचा
गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून त्याची दुचाकी घेऊन पळून गेला.
याबाबत माहिती मिळताच राहुल याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत चंदर विरोधात तक्रार दिली.
दरम्यान, मयत रेश्मा हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.
अहवालातून रेश्मा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती चंदर याच्यावर खूनाचा
गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामणी करीत आहेत.