Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडण सोडवणाऱ्या दोघांना बेदम मारहाण, 8 जणांना अटक; पर्वती परिसरातील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | टोळक्याकडून मित्राच्या भावाला माराहण सुरु असताना त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांना बेदम मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.21) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास जनता वसाहत येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत रोहित सुभाष गोरखे (वय-23 रा. ग.नं. 77 वरचा टप्पा, जनता वसाहत, पर्वती, पुणे) याने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम उर्फ बॉम्ब कैलास कांबळे (वय-26), अल्ताब उर्फ चांद फारुख सय्यद (वय-24), रत्नदिप उर्फ बाळा संपत रणखांबे (वय-23), ओंकार प्रमोद परदेशी (वय-20), मयुर गणेश काळे (वय-26), झेंड्या उर्फ संदीप शिवनारायणसिंग ठाकुर (वय-19), बल्लोर उर्फ राहुल शिवनारायण सिंग ठाकूर (वय-22), सुमित बाळकृष्ण सोनावणे (वय-24 सर्व रा. जनता वसाहत, पुणे) यांच्यावर आयपीसी 307, 323, 143, 144, 147, 148, 149, 504, 506 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित व त्याचा मित्र पवन कोळी हे वरचा टप्पा येथे चालत जात होते.
त्यावेळी त्यांच्या मित्राचा भाऊ शंकर काकडे याला आरोपी मारहाण करत होते.
त्यामुळे रोहित व पवन हे शंकर याच्या मदतीसाठी गेले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी व पवन यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपी सुमित सोनावणे याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी स्टम्प मारुन जखमी केले.

तर पवनच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सोनावणे याच्या इतर साथीदारांनी रोहित व पवन यांना बांबू व दगडाने मारहाण केली.
यावेळी वस्तीतील लोक त्याठिकाणी आले. आरोपींनी लोकांना धमकावून परिसरात दहशत पसरवली.
घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घावटे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.