Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडी लावण्यावरुन वाद, तरुणीला शिवीगाळ करुन विनयभंग; येरवडा परिसरातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | बिल्डिंगसमोर पार्क केलेली गाडी बाजूला करुन त्याठिकाणी तरुणीने तिची गाडी पार्क केली. यावरुन भाजी विक्रेत्या महिलेने व तिच्या मुलाने तरुणीला शिवीगाळ केली. तर महिलेच्या मुलाने तरुणीसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केला. हा प्रकार रविवारी (दि.21) रात्री आठच्या सुमारास येरवडा येथे घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आई आणि मुलावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत येरवडा येथे राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे.
यावरुन चांगुणाबाई (वय-45) आणि दिपक (वय-25 दोघे रा. वडारवस्ती, येरवडा) यांच्यावर आयपीसी 354, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला तरुणी राहात असलेल्या बिल्डिंग समोर भाजी विक्रीचा व्यवसाय करते.

रविवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या बिल्डींगसमोर तिची गाडी पार्क केली होती.
त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीची गाडी बाजूला करुन त्यांची गाडी त्याठिकाणी लागवली.
याचा राग आल्याने आरोपींनी तरुणीला शिवीगाळ केली. तर महिलेच्या मुलाने तरुणीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला.
तसेच राहायला तर इथेच आहेस ना बघुन घेतो तुला अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.