Pune Crime News | पुणे : महिलेकडे शरीर संबंधाची मागणी, खंडणी मागीतल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0

पुणे : – Pune Crime News | महिलेकडे शरीर संबंधाची मागणी करुन मारहाण करत अंगावरील कपडे फाडून खंडणीची मागणी केली. तसेच फेसबुकवर फोटो अपलोड करुन अश्लिल मेसेज लिहून बदनामी केल्याप्रकरणी एकावर भारती विद्यापीठ पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 17 मे रोजी सायंकाळी सात ते 18 मे या कालावधीत आंबेगाव पठार येथे घडला आहे.

याबाबत 45 वर्षीय महिलेने रविवारी (दि.19) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन महादेव सिताराम सुरवसे
Mahadev Sitaram Suravase (र. जुना बाजार जवळ, बीड) याच्यावर आयपीसी 354, 354(अ), 354(ब), 354(ड), 323, 506, 385 सह आयटी अॅक्ट नुसार (IT Act) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाजी घेण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांचा पाठलाग केला. फिर्य़ादी यांचे केस पकडून तू माझे फोन का उचलत नाही, मला का भेट नाही असे म्हणून शरीर संबंधाची (Physical Relationship) मागणी केली. महिलेने त्याला नकार दिला असता त्याने हाताने मारहाण करुन फिर्य़ादी यांच्या अंगावरी कपडे फाडून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच त्याच्या फेसबुक अकाउंटवर फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीचा एकत्रीत फोटो अपलोड केला. फोटो अपलोड करताना त्याने अश्लिल मेसेज (Obscene Messages) लिहून फिर्यादी यांची बदनामी केली.

यानंतर आरोपी महादेव सुरवसे याने महिलेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज करुन 2700 रुपये पाठवण्यास सांगितले. पैसे दिले नाही तर जगू देणार नाही अशी धमकी दिली. तसेच पैशासाठी त्रास देण्याची धमकी दिली. पतीकडून पैसे वसूल करुन बीडला जाईन असा मेसेज करुन पैसे दिले नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने (Pi Sharad Zine) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.