Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, पिस्टल व काडतूस जप्त

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | बेकायदेश पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.3) रात्री साडे नऊच्या सुमारास खराडी बायपास (Kharadi Bypass) बस स्टॉपच्या शेजारी असलेल्या फुटपाथवर केली. राकेश शंकर ठोकळ (वय-23 रा. खजुरवस्ती दर्ग्याच्या मागे, वैदुवाडी, हडपसर) असे अटक (Arrest) केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

विमानतळ पोलीस ठाण्यातील (Viman Nagar Police Station) तपास पथकाचे पोलीस अंमलदार शैलेश नाईक व सचिन जाधव यांना माहिती मिळाली की, खराडी बायपास बसस्टॉप जवळ असलेल्या फुटपाथवर एक जण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस (Cartridge) आढळून आले. पोलिसांनी पिस्टल व काडतूस जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राकेश ठोकळ सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग
रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे
(DCP Shashikant Borate), येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil)
यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे (Sr PI Anandrao Khobare),
पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता माळी (PI Sangita Mali) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन (API Vijay Chandan), पोलीस अंमलदार रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, सचिन जाधव, सचिन कदम, अंकुश जोगदंडे, रुपेश तोडेकर, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, शंकर वाघुले, विशाल निलख, राकेश चांदेकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.