Pune Pimpri Chinchwad Crime News | रिक्षा चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड पोलिसांकडून अटक, तीन रिक्षा जप्त

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | सिंहगड रोड परिसरातून रिक्षा चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. आरोपीकडून दोन लाख 55 हजार रुपये किमतीच्या तीन रिक्षा जप्त (Auto Rickshaw Seized) करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई 31 डिसेंबर रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास प्रयोजा सिटी समोरील सर्व्हिस रोडवर करण्यात आली. विशाल युवराज राऊत (वय-19 रा. मु.पो. अंतोली ता. वेल्हा, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीतील वडगाव बुद्रुक येथील केंदार अपार्टमेंट मध्ये पार्किंग केलेली अॅटोरिक्षा चोरीला गेली होती. ही घटना 28 डिसेंबर रोजी घडली होती. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अंमलदार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दाखल गुन्ह्याचा तपास करत होते. दरम्यान, 31 डिसेंबर रोजी तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर (ASI Aba Uttekar), पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना माहिती मिळाली की, एक तरुण प्रयोजा सिटी समोरील सर्व्हिस रोडवर काळी-पिवळी रिक्षा घेऊन त्यामध्ये बसला आहे. ही रिक्षा चोरीची असल्याची माहिती मिळाली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

तपास पथक त्याठिकाणी गेले असताना एक जण रिक्षा घेऊन जाण्याच्या तयारी असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याकडे असलेल्या रिक्षाबाबत चौकशी केली. मात्र त्याने काहीच माहिती दिली नाही.
रिक्षा चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीला अटक करुन रिक्षा जप्त केली.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने कात्रज चौक, सर्प उद्यान कात्रज येथून रिक्षा चोरी केल्याचे सांगितले.
त्याच्याकडून 2 लाख 55 हजार रुपयांच्या तीन रिक्षा जप्त करुन सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील एक आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (Bharti Vidyapeeth Police Station) दोन असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam),
सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन
(Sr PI Abhay Mahajan), पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam), पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी
(PSI Ganesha Mokashi) पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, राजु वेगरे, राहुल ओलेकर, सागर शेडगे,
अमोल पाटील, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, विकास पांडुळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, दक्ष पाटील,
स्वप्नील मगर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.