Nashik Crime News | तीन सराईत आरोपींना उपनगर पोलिसांकडून अटक, दोन पिस्टल तीन काडतुसे जप्त

0

नाशिक : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Nashik Crime News | नाशिक पोलिसांच्या उपनगर पोलिसांनी विशेष मोहिम राबवून तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई रविवारी (दि.28) रात्री नाशिक पुणे रोडवरील इच्छामणी लॉन्स जवळ करण्यात आली. (Nashik Crime News)

शुभम अशोक जाधव (वय-23), सचिन धर्मा सोनवणे (वय-24 दोघे रा. सोनवणे बाबा चौक, समतानगर, उपनगर, नाशिक), गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी (वय-24 रा. सिद्धार्थ किराणा जवळ, समतानगर, नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

नाशिक शहरातील गुंड प्रवृत्तीच्या व दहशत पसरवणाऱ्या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर उपनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने हद्दीतील समतानगर झोपडपट्टी, टाकळी गाव, आम्रपाली झोपडपट्टी, रोकडोबावाडी, फर्नांडीस वाडी या भगात विशेष मोहिम राबवून उघड्यावर दारु पिणारे, टवाळखोर यांच्यावर कारवाई केली जात होती.

रविवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार जयंत शिंदे व गुंड यांना माहिती मिळाली की, नाशिक पुणे रोडवरील इच्छामणी लॉन्सजवळ एक व्यक्ती गावठी कट्टा व काडतुस घेऊन येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त केले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांच्या एका साथीदाराकडे गावठी कट्टा असल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपींच्या साथीदाराला अटक करुन एक गावठी कट्टा व दोन काडतुसे जप्त केले. पुढील तपास पोलीस हवालदार इमरान शेख करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक (IPS Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बाबासो दुकळे, सहायक पोलीस निरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार लखन, इमरान शेख, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुरज गवळी, पंकज कर्पे, राहुल जगताप, सौरभ लोंढे, संदेश रगतवान यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.