Pune Pimpri Chinchwad Crime News | महागड्या सायकलींची विक्री करुन कंपनीची पावणे 6 लाखांची फसवणूक, स्टोअर मॅनेजरवर FIR; बाणेर परिसरातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | कंपनीच्या गोडावूनमधील सायकल (Bicycles) व स्पेअर पार्टची विक्री करुन कंपनीची 5 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या स्टोअर मॅनेजरवर (Store Manager) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल 2023 ते 21 डिसेंबर 2023 या कालावधीत बाणेर येथील स्ट्रायडर प्रा. लि. कंपनीच्या सायकलच्या शोरुमध्ये घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत प्रमोद ओमप्रकाश शुक्ला Pramod Omprakash Shukla (वय-43 रा. कासरवडवली, ठाणे) यांनी सोमवारी (दि.25) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन स्टोअर मॅनेजर श्रीनिवास विठ्ठलराव सुगावकर Srinivas Vitthalrao Sugaonkar (वय 35 रा. ग्रॅन बे, सोलापूर हायवे, मांजरी बु.) याच्यावर आयपीसी 408 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुगावकर हा फिर्यादी यांच्या स्ट्रायडर प्रा. लि. (Strider Pvt. Ltd.) कंपनीमध्ये
स्टोअर मॅनेजर म्हणून काम करतो. कंपनीचे बाणेर येथे सायकलचे शोरुम आहे.
या शोरुमची जबाबदारी सुगावकर याच्यावर सोपवण्यात आली होती.
आरोपीने एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत कंपनीच्या 5 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या 60 सायकलची विक्री केली.

विक्री केलेल्या सायकलचे पैसे कंपनीच्या खात्यात न घेता आरोपीने स्वत:च्या बँक खात्यात जमा करुन घेतले.
तसेच शोरुममधील 5 हजार रुपये किमतीचे टायर, बेल, सीट, पँडल, रिम इत्यादी स्पेअर पार्टची विक्री करुन त्याचेही
पैसे स्वत:च्या खात्यात जमा करुन घेतले. आरोपीने कंपनीची 5 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली.
पुढील तपास सहायक पोलीस फौजदार राहीगुडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.